*आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड मध्ये राखीपौर्णिमा उत्साहात साजरी*
लोकनेते हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड विटामध्ये राखीपौर्णिमा सण उत्साहात साजरा करण्यात आली.यावेळी नर्सरी ते दहावी चे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते.त्यावेळी सर्व विद्यार्थिनींनी सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना राखी बांधली त्यावेळी प्रत्येक विद्यार्थ्यांने त्यांना शालोपयोगी भेटवस्तू दिली.
तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुम बागवान मॅडम, शाळेतील सर्व शिक्षिका व विद्यार्थिनींनी वृृक्षांना राखी बांधली व त्यातून वृृक्ष संवर्धन व पर्यावरण वाचवा हा संदेश दिला.
या कार्यक्रमाचे नियोजन सर्व शिक्षक स्टाफ व कर्मचारी यांनी केले होते.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुम बागवान यांनी सर्वांचे कौतुक केले व राखीपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
0 Comments