**आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड मध्ये कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी.**
लोकनेते हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड विटामध्ये कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुम बागवान मॅडम यांनी हंडी व पाळणा पूजन करून करण्यात आली.
यावेळी श्री बाळकृष्णाचे पूजन करून पाळणागीत म्हणण्यात आले.व त्यानंतर प्री -प्रायमरी विभागाच्या मुलांनी काठीच्या सहाय्याने हंडी फोडण्याचा प्रयत्न करत हंडी फोडली.
यावेळी सर्व मुलांनी पाण्याचा कमीत कमी वापर करून "पाणी वाचवा देश वाचवा" "झाडे लावा झाडे जगवा" असा संदेश दिला.दहीहंडी फोडण्याच्या वेळी पाण्याच्या जागी चिरमुरे गुलालाची उधळण करून गाण्याच्या तालावर नृत्य करून हा नयनरम्य सोहळा उत्साहात पार पडला.यावेळी पाऊसाचे आगमन झाले आणि कार्यक्रमाची रंगत अजून वाढली. व लहान गटातील प्री - प्रायमरी विभागाच्या मुलांनी कृष्ण गोपीकाचा पोशाख परिधान केला होता.
यावेळी मुलांना दहीहंडी फोडताना इजा होऊ नये याची विशेष काळजी शिक्षकांनी घेतली होती.
या कार्यक्रमाचे नियोजन सर्व शिक्षक स्टाफ व कर्मचारी यांनी केले होते.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुम बागवान मॅडम यांनी सर्वांचे कौतुक केले.
निवडक फोटो / क्षण





















0 Comments