आदर्श स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांचे योगा स्पर्धेत यश

विटा:-१२ सप्टेंबर 
दि.०६/०९/२०१९  रोजी आदर्श संकुल विटा येथे झालेल्या तालुकास्तरीय योगा  स्पर्धेत लोकनेते मा.हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड विटा येथील विद्यार्थिनीनी  योगा  स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले यामध्ये जिल्हास्तरावर पाच  विद्यार्थिनीची निवड झाली.यामध्ये 
१.प्राची पवनकुमार पाटील (८वी)  २.साक्षी मल्हारी खटावकर (७ वी) ३.श्रुती जगन्नाथ मनगुत्ते (७वी) या विद्यार्थिनींनी १४ वर्षांखालील वयोगटात सहभाग घेतला होता.तसेच रौनक हनीफ कुरेशी (८ वी) व निवेदिता संतोष यादव (८ वी) यांनी 19 वर्षाखालील मुली या वयोगटात सहभाग घेतला होता.
यामध्ये .१४ वर्षाखालील वयोगटात प्राची पवनकुमार पाटील हिने द्वितीय क्रमांक 
साक्षी मल्हारी खटावकर हिने  तृतीय क्रमांक व श्रुती जगन्नाथ मनगुत्ते हिने पाचवा क्रमांक पटकिवला. 
तसेच 19 वर्षाखालील वयोगटात रौनक हनीफ कुरेशी हिने तालुका स्तरावर *प्रथम क्रमांक* व निवेदिता संतोष यादव हिने पाचवा क्रमांक पटकविला.
या पाचही विद्यार्थिनीची जिल्हास्तरीय निवड झाली असून या स्पर्धा क्रीडा संकुल सांगली येथे दि.21/09/2019 रोजी होणार आहे.
या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुम बागवान मॅडम यांनी गुलाब पुष्प देऊन विद्यार्थिनींचे अभिनंदन केले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या विद्यार्थ्यांना योगा प्रशिक्षक वंदना पाटील व क्रीडा शिक्षक संजय गायकवाड  यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.